बेसिस किड्स अभ्यास काय आहे?

बेसिस किड्स अभ्यास हिमोफिलिया A किंवा B असलेल्या मुलांसाठी एका अभ्यास औषधाची चाचणी करत आहे. अभ्यास औषधाची सुरक्षितता आणि ते शरीरात काय करते हे या अभ्यासात पाहिले जाईल. हे अभ्यास औषध हिमोफिलिया असलेल्या लोकांमध्ये सामान्यतः होणाऱ्या रक्तस्त्रावांना प्रतिबंध करू शकते का, हे संशोधकांना पाहायचे आहे.

हे अभ्यास औषध फॅक्टर रिप्लेसमेंट उपचारपद्धती नाही. जो गोठण्याची प्रक्रिया थांबवतो अशा शरीरात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या पदार्थाला ते ब्लॉक करते. असे केल्याने, अभ्यास औषधामुळे गोठण्याच्या क्रियेत वाढ होऊ शकते.

हिमोफिलिया आणि चिकित्सालयीन चाचण्यांमधील सहभागाच्या त्यांच्या अनुभवाबद्दल बोलत असलेल्या चार्ली आणि त्याची आई, हॅना यांची ओळख करून घ्या.

"In My Shoes" व्हिडिओ पाहा

कोण सहभागी होऊ शकेल?

तुमचे मूल अभ्यासासाठी विचारात घेतले जाण्याकरिता, हे आवश्यक आहे:

  • 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा/पुरुष असणे
  • इनहिबिटर्ससह किंवा त्याशिवाय तीव्र हिमोफिलिया A किंवा मध्यम तीव्र ते तीव्र हिमोफिलिया B असणे
  • छाननी प्रक्रियेद्वारे निर्धारित केल्यानुसार अतिरिक्त आवश्यकता पूर्ण करणे
  • काही लोक रिप्लेसमेंट फॅक्टर उपचारपद्धतीसाठी इनहिबिटर्स विकसित करतात, जे तिला कार्य करण्यापासून आणि गुठळी तयार करण्यापासून प्रतिबंधित करतात. यामुळे रक्तस्त्राव थांबवणे अधिक कठीण होते. चाचणी केली जात असलेल्या अभ्यास औषधावर इनहिबिटर्सचा परिणाम होत नाही.

अभ्यासादरम्यान काय होते?

तुमचे मूल सुमारे 14 महिने अभ्यासात असेल. संपूर्ण अभ्यासादरम्यान, तुमच्या मुलाचे आरोग्य तपासण्यासाठी त्याच्या केंद्रावर भेटी आणि अभ्यास पथकासोबत फोन कॉल होतील.

एकदा तुमच्या मुलाने अभ्यास पूर्ण केला, की त्याला वेगळ्या अभ्यासाचा भाग म्हणून विस्तारित कालावधीसाठी अभ्यास औषध घेणे सुरू ठेवण्याचा पर्याय असू शकतो. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही तुमच्या मुलाच्या अभ्यास डॉक्टरांशी याची चर्चा करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

परवानगी

अभ्यास डॉक्टर प्रथम तुमच्यासोबत माहितीपूर्ण संमती प्रपत्राचे पुनरावलोकन करतील, ज्यामध्ये अभ्यासाचे सर्व तपशील आहेत. यावर विचार करण्यासाठी आणि तुम्हाला आणि तुमच्या मुलाला असतील ते कोणतेही प्रश्न विचारण्यासाठी हवा तेवढा वेळ घ्या. तुमचे मूल अभ्यासामध्ये सहभागी होऊ देणे तुम्हाला मान्य असल्यास, तुम्ही प्रपत्रावर सही करुन तुमची परवानगी द्याल. तुमचा मुलगा सुद्धा अनुमती प्रपत्र म्हटले जाणाऱ्या अशाच एका प्रपत्रावर सही करून तो अभ्यासात भाग घेण्याचे मान्य करत असल्याची नोंद शकतो.

माहितीपूर्ण संमती व्हिडिओ पाहा

छाननी

तुमचे मूल अभ्यासासाठी पात्र आहे का हे पाहण्यासाठी, अभ्यास डॉक्टर तुमच्या मुलाचे आरोग्य, वैद्यकीय इतिहास आणि तो घेत आहे त्या औषधांबद्दल प्रश्न विचारतील. तुमच्या मुलाची शारीरिक तपासणी आणि रक्त आणि मूत्र चाचण्यांसह काही चाचण्या देखील केल्या जातील. छाननी कालावधी अंदाजे एक महिना असतो


अभ्यास उपचार

अभ्यासासाठी पात्र ठरलेल्या सर्व मुलांना 12 महिने अभ्यास औषध मिळेल. या कालावधीदरम्यान, तुमच्या मुलाचे आरोग्य तपासण्यासाठी त्याच्या केंद्रावर अंदाजे 9 भेटी आणि अभ्यास पथकासोबत 5 फोन कॉल होतील. तुम्ही पसंत केल्यास आणि स्थानिक नियमनांनी परवानगी दिल्यास यापैकी काही भेटी तुमच्या घरी होऊ शकतात.


पाठ-पुरावा

तुमच्या मुलाने स्वतंत्र अभ्यासाचा भाग म्हणून अभ्यास औषध घेणे सुरू ठेवण्याचे न निवडल्यास, अभ्यास डॉक्टर तुमच्या मुलाच्या अभ्यास औषधाच्या अंतिम मात्रेच्या 30 दिवसांनंतर त्याच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधतील.

अभ्यास औषध कसे दिले जाते?

जी नियमित आधानाद्वारे (शिरेमध्ये हळूहळू) दिली जाते अशा फॅक्टर रिप्लेसमेंट उपचारपद्धतीच्या विरुद्ध, अभ्यास औषध त्वचेच्या थेट खाली असलेल्या मेद उतींमध्ये पातळ सुईने इंजेक्शनद्वारे (टोचणे) आठवड्यातून एकदा दिले जाते.

पहिले इंजेक्शन अभ्यास केंद्रावर दिले जाईल. इतर मात्रा घरी किंवा तुम्हाला पसंत असल्यास असल्यास केंद्रावर दिल्या जातील.

  • टीप: तुमच्या मुलाला इंजेक्शन कुठे मिळते हे तो भरून-तयार सिरिंज वापरत आहे की पेन यावर अवलंबून असू शकते.
  • स्थान तुमचे मूल स्वतःच स्वतःला इंजेक्शन देत आहे की निगाप्रदाता किंवा अभ्यास डॉक्टर इंजेक्शन देत आहेत यावर देखील अवलंबून असेल.
इंजेक्शनसाठी सूचना

अभ्यास भेटींमध्ये माझ्या मुलाच्या कोणत्या प्रकारच्या चाचण्या होतील?

अभ्यास भेटींदरम्यान, तुमच्या मुलाचे आरोग्य तपासण्यासाठी चाचण्या करण्यात येतील. तुमच्या मुलाच्या होतील अशा काही चाचण्या खाली दिल्या आहेत. त्याच्या प्रत्येक भेटीत सर्व चाचण्या होतील असे नाही.

जीवनावश्यक चिन्हे

शारीरिक तपासणी

सांध्यांची तपासणी

रक्त चाचण्या

मूत्र चाचणी

हृदय कृती (ECG)

प्रश्नावल्या


आम्हाला करायचे आहे असे आणखी काही आहे का?

अभ्यासादरम्यान यांसारखी माहिती संकलित करण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनसारखे हातात धरायचे इलेक्ट्रॉनिक साधन दिले जाईल:

  • तुमच्या मुलाला झालेले कोणतेही रक्तस्त्राव
  • तुमच्या मुलाच्या रक्तस्त्रावांवर उपचार करण्यासाठी वापरलेली कोणतीही औषधे
  • तुमच्या मुलाला त्याचे अभ्यास औषध इंजेक्शन कधी मिळते

अभ्यास केंद्र शोध

खाली तुमच्या भागातील अभ्यास केंद्रांची यादी आहे:

Showing 0 Results Near You

Study Site

Study Provider

Address

Contact